जामखेड न्युज——
खर्डा येथे अल्पवयीन मुलीचा बारवात पडून मृत्यू, परिसरात शोककळा
बारवात पोहत असताना पायऱ्यावरील शेवाळावर पाय घसरून सानिका ज्ञानेश्वर काशीद वय 10 वर्षे
हीचा पाय घसरून दगडी पायरीवर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला यामुळे पाण्यात पडून मृत्यू झाला यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, खर्डा येथील मुलीची वडील ज्ञानेश्वर हरिभाऊ काशीद यांनी पोलीस स्टेशनला खबर देऊन माहिती दिली की, दि. 4 मे रोजी दुपारी 2 वाजता मी व माझी मुलगी असे आम्ही दोघेजण पोहत होतो त्यानंतर मी कामानिमित्त गावात आलो. परंतु मुलगी कु. सानिका ज्ञानेश्वर काशीद वय 10 वर्षे ही ओंकारेश्वर मंदिरासमोरील पुरातन काळातील बारवात पुन्हा पोहत असताना ती वरती येऊन पुन्हा पोहण्यासाठी उडी मारताना तिचा दगडी पायऱ्याला शेवाळ असल्यामुळे पाय घसरून ती खालील दगडी पायरीवर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून ती पाण्यात पडून बुडाली, त्यानंतर ती पाण्याच्या वर न आल्याने शुक्रवार पेठेतील पोहणाऱ्या मुलांनी एक ते दीड तास प्रयत्न करून तिला वर आणण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा शोध घेण्यास अडचण येत होती.
त्याच वेळी ही वार्ता खर्डा शहरात पसरली यावेळी महिलांनी व लोकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर अनिल गोपाळघरे या धाडसी युवकाने पाण्यात खोल बुडी घेऊन कु.सानिकाला बाहेर काढले परंतु डोक्याला मार लागल्याने व तिला पोहता आले नाही त्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
त्यावेळी आई व कुटुंबाचा रडण्याचा प्रचंड आक्रोश झाला, त्यावेळी उपस्थित जनसमुदायाचे सुद्धा मन हेलावून गेले. होते. यावेळी सानिका काशीद हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला, कु. सानिका काशीद हीला पोहता येत असूनही तिचा मृत्यू झाल्याने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे. तिच्या मागे आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जायभाय पोलीस नाईक संभाजी शेंडे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्ह हे करीत आहेत.