Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात तीघांचा मृत्यू, दोघं जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात तीघांचा मृत्यू, दोघं जखमी

0
1238

जामखेड न्युज——

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात तीघांचा मृत्यू, दोघं जखमी

 

समृद्धी महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 304 येथे ही घटना घडली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून दोघं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. धडक देणारे वाहन चालक फरार झाला आहे. पोलीस शोध घेत आहेत.


अपघातातील मृत आणि जखमी छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. अपघातात एक जण जागेवरच मृत पावला, तर इतर दोघे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावले. पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

मृतांची नावे

1.लताबाई पुरुषोत्तम मेहेर
2.मुकेश अनुज राम मेहेर
3.अत्मजा मुनोरबोद


समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच!

समृद्धी महामार्गावरील एकामागोमाग एक अपघातांचे सत्र पाहता हा महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असल्याचं समोर येतंय. सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.


समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबत नसून महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न आता पडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!