जामखेडचे रहिवासी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात गुन्हा दाखल गुन्ह्याचे कारण जामखेडमधील अनाधिकृत गर्भपात केंद्र

0
3984

जामखेड न्युज——

जामखेडचे रहिवासी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात गुन्हा दाखल

गुन्ह्याचे कारण जामखेडमधील अनाधिकृत गर्भपात केंद्र

 

जामखेड येथील रहिवासी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जामखेड मधील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचे यायुवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे जामखेड मधील अनाधिकृत गर्भपात केंद्र चौकशी च्या फेऱ्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांवर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले असतानाच आता पोलीस उपनिरीक्षकाचे नवे प्रकरण समोर आले आहे. ३३ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून या पोलीस उपनिरीक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातून समोर आलेल्या या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जामखेड मधील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचे यायुवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) मुळ गाव जामखेड असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ऑगस्ट २०१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे हा प्रकार घडला. महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना आरोपी उपनिरीक्षकाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून प्रेम संबंध निर्माण झाल्याने त्याने पीडित युवतीला शिवाजीनगर गावठाणातील एका घरी नेले. तिथे तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली.

पीडित युवती गर्भवती असल्याचे समजतात उपनिरीक्षक महामुनी याने तिला जामखेड तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिचा गर्भपात करण्यात आला, असे पीडित युवतीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

चौकट

जामखेड शहरात अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी अनाधिकृत गर्भपात केंद्र होते यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत गर्भपात करत काही खाजगी डॉक्टरांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी डॉक्टर वर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here