जामखेड न्युज——
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात एक गंभीर जखमी
गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेले जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्ता एक पट्टी तयार तयार झाली आहे पण अरूंद पट्टी मध्ये दोन वाहने बसत नाहीत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सकाळी मोटारसायकल व आयसर टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील रूपेश फक्कड नाईकनवरे माळीगल्ली पाटोदा हे गंभीर जखमी झाले. जखमीला शकील पठाण, अशोक भिलारे, प्रकाश मुरूमकर व इतर मित्र परिवाराने मदत केली
ताबडतोब खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
आज सकाळी साडेदहा च्या वेळेस रूपेश फक्कड नाईकनवरे वय ३५ हे आपल्या एम एच 14 सी. व्ही 8868 हिरो होंडा मोटारसायकल वर जामखेड वरून पाटोदा येथे आपल्या गावी चालले होते. तर जामखेड कडे आयसर टेम्पो एम एच 23 ए.यु.4179 क्रमांकाचा येत होता. नायरा प्रेट्रोल पंपासमोर साकेश्वर मिसळ हाऊस समोर समोरासमोर धडक झाली यात मोटारसायकल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मोटारसायकल वरील नाईकनवरे गंभीर जखमी झाले जखमीला ताबडतोब जामखेड येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आईसर चा पाठलाग हरिदास मुरूमकर व कृष्ण माने आणि राम आडले यांनी टेम्पो चा पाठलाग करून पकडले.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याची एक पट्टी तयार झाली आहे पण यावर दोन गाड्या बसत नाहीत. यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. साकत फाटा ते नायरा पेट्रोल पंप या चारशे मीटर अंतरावर सहा महिन्यात अनेकवेळा अपघात झाले आहेत यात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता काम व्हावे अशी मागणी होत आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. डीएलसी क्राँक्रेटला अनेक ठिकाणी तडे तसेच कच्च्या थराच्या सिंमेटची पुर्णपणे राख झाली आहे. त्यावरच पक्का थर टाकला कामाची जेवढी जाडी हवी तेवढी जाडी नव्हती. तसेच गटार कामे सरळ रेषेत नाहीत. वाकड्या तिकड्या गटारी कामे तसेच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी गटार कामे एकसलग नाहीत. पाणी नीट मारले जात नाही त्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.
महामार्गाच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. तसेच मातीमिश्रीत मुरूम त्यावर मारलेले पाणी यामुळे अनेक लोक गाडीवरून घसरून पडतात यात अनेकांना अपंगत्व आले आहे. तर चार महिन्यात दोन मृत्यू झाले आहेत. ताबडतोब रस्ता कामाची गती वाढवावी तसेच चांगले काम करावे अशी मागणी होत आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीमुळे जामखेड परिसरातील वाहनधारक व नागरिक एक वर्षापासून हैराण आहेत. काही ठिकाणी गटारे केले आहेत. तेही कमी जाडीचे आहेत तर अनेक ठिकाणी गटाराच्या कामाला चिरा पडल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाला कोणत्याही ठिकाणी सुरक्षिततेसाठी काहीही नाही. यामुळे वारंवार अपघात होत आहेत या चार दिवसात नायरा पेट्रोल पंप ते साकत फाटा या दरम्यान हा सहावा अपघात आहे. राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या संथगती कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणखी किती बळी घेणार हा खरा प्रश्न आहे.