जामखेड न्युज——
जामखेड शहरात अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन कोमात
भेसळयुक्त दारूने नवविवाहितांचे संसार उघड्यावर
जामखेड येथील मिलिंदनगर या भागामध्ये सध्या अवैध धंद्याचा सुळसुळाट चालू असून यामध्ये ताडी गांजा दारू यासारखे मादक पदार्थांचे विक्री सर्रास चालू आहे. सदरील धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थांची तहसीलदारांकडे व पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
सदरील नशेच्या आहारी या भागातील अनेक तरुण नादी लागले आहेत. यामुळे मध्यंतरी एका विवाहित युवकाचा मृत्यूही झाला आहे. त्या अगोदर अनेक तरुण या नशाच्या आहारी गेल्यामुळे मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेले सर्वजण हे विवाहित असून आज त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना लहान लहान मुले असून वयोवृद्ध आई-वडिलांचा आधार संपलेला आहे.
तरी वरील बाबींचा विचार करून मिलिंदनगर या भागामध्ये सुरू असलेले अवैध धंदे ताबडतोब बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून केली असून कारवाई न केल्यास दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर मिलिंदनगर भागातील ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्यात येईल याचे निवेदन तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन जामखेड यांना दिले असून त्यावेळी होणाऱ्या परिणामांची प्रशासनावर जबाबदारी राहील असे सांगण्यात आले आहे.
यावेळी भिमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, मनसेचे शहराध्यक्ष सनी सदाफुले, अतुल वाघमारे, अजिनाथ शिंदे अलका वाघमारे, अक्षय शिरोळे सुर्यकांत सदाफुले अनिल जावले अँड ऋषीकेश डुचे पोपट फुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.