सरपंच पती सह चार व्यक्तींवर जीवघेणा हल्ला जामखेड तालुक्यात एकच खळबळ

0
5894

जामखेड न्युज——

सरपंच पती सह चार व्यक्तींवर जीवघेणा हल्ला जामखेड तालुक्यात एकच खळबळ

पंचायत समितीमध्ये माझी तक्रार करता काय असे म्हणुन दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. याची तक्रार दोन दिवसांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती याचा राग मनात धरून नऊ ते दहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन तलवार, कोयता, रॉड, काठीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच माझे सोबतच्या चार लोकांना मारहाण करुन जखमी करत चारचाकी गाडीचे नुकसान केले व शिविगाळ दमदाटी केली तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. सरपंच पती सह चार व्यक्ती वर झालेल्या हल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिलिंद श्रीधर जीवडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी 1) योगेश बापुराव इथापे 2) घनश्याम सोनबा कसाब 3) ऋषीकेश शिवाजी साळुंके 4) मयुर घनश्याम कसाब सर्व रा. झिक्री ता. जामखेड 5) अतुल जनार्धन कसाब रा. चौंडी ता. जामखेड व इतर 4 ते 5 जण अशा नऊ ते दहा आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांचे हातातील तलवार, गोयता, रॉड, काठीने मला जीवे ठारमारण्याचे उद्देशाने मारहाण करुन जखमी केले अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. यामुळे सरपंच पती

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, झिक्री गावचे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत ग्राम रोजगार सहाय्यक नामे योगेश बापुराव इथापे हा रोजगार हमीचे कामावर असलेल्या मजुरांची हजेरी लावण्या करीता मजुरांकडून जादाचे पैसे घेतले बाबत मी व गावातील काही लोकांनी मागील दोन महिण्या पुर्वी झालेल्या ग्रामसभेत तक्रार केली होती. त्या तक्रारीचे अनुशंगाने दिनांक 21/11/2025 रोजी पंचायत समितीचे अधिकारी आमचे गावात आले होते. त्यांचे समोर देखील योगेश इथापे याने मला व माझे वडीलांना तसेच गावातील काही लोकांना अरेरावीची भाषा करून शिविगाळ केली होती.

दिनांक 24/11/2025 रोजी माझे चुलते मुकुंद रावण जिवडे हे हनुमान मंदिर झिक्री चे समोर बसलले असताना तेथे योगेश इथापे हा रात्री 08/00 वा. सुमारास आला व त्याने त्यांना शिविगाळ करुन तुम्ही माझी पंचायत समीतीमध्ये तक्रार करता काय असे म्हणुन दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. त्याबाबत चुलते मुकुंद जिवडे यांनी योगेश इथापे याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.


दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 08/0 वा. सुमारास मी, दत्तात्रय बंकट साळुंके व मुकुंद रावण जिवडे असे दत्तात्रय साळुंके यांचे चार चाकी गाडी क्रमांक MH-16-DS-7100 ही मध्ये बसुन झिक्री गावचे शिवारात माझे जमीनी जवळ खांडवी रोडने गाडीत बसुन गेलो होतो. त्यावेळी अचानक माझा चुलत भाऊ सागर मुकुंद जिवडे हा आमचे जवळ मोटारसायकलवर आला व त्याने सांगितले की,

झिक्री गावात 1) योगेश बापुराव इथापे 2) घनश्याम सोनबा कसाब 3) ऋषीकेश शिवाजी साळुंके 4) मयुर घनश्याम कसाब सर्व रा. झिक्री ता. जामखेड 5) अतुल जनार्धन कसाब रा. चौंडी ता. जामखेड व इतर 4 ते 5 जण तुम्हाला शिविगाळ करुन मारहाण करायची आहे असे म्हणत आहेत. त्यामुळे मी तुम्हास हे सांगण्यासाठी आलो आहे. असे त्यांने सांगितले. त्यानंतर लगेच पाठीमागुन झिक्री करुन काही चारचाकी गाड्या आल्या त्या गाड्या मधुन वरील लोक हातात तलवार, कोयते, काठ्या, लोखंडी रॉड, हातात घेवुन खाली उतरले. त्यावेळी योगेश इथापे याने त्याचे हातातील तलवारीने माझ्या कपाळावर,डोक्यावर, डाव्या पायावर, मांडीवर व उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली मारुन गंभिर दुखापत केली.. 

तसेच घनश्याम सोनबा कसाब याने त्याचे हातातील कोयत्याने चुलते मुकुंद जिवडे यांना डोक्यात मारुन जखमी केले. ऋषीकेश शिवाजी साळुंके याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने सागर जिवडे यास डावे हातावर, पायावर व पाठीवर मारहाण केली आहे. मयुर घनश्याम कसाब याने त्याचे हातातील काठीने दत्तात्रय साळुंके यास हातावर, पाठीवर मारहाण केली आहे. व अतुल जनार्धन कुबास याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने मला व चुलते मुकुंद जिवडे यांना मारहाण केली आहे. तसेच पाठीमागुन मोटारसायकलवर आलेला प्रविण रामभाऊ साळुंके यास देखील मयुर कसाब याने काठीने मारहाण केली आहे. तसेच इतर अनोळखी 4 ते 5 लोकांनी त्यांचे हातातील लाकडी काठीने आम्हास मारहाण केली आहे. आम्ही जखमी झाल्याने रोड वरुन पळु लागलो त्यावेळी त्यांनी शिविगाळ करुन तुम्ही आमचे नादी लागला तर एक एकाचा मुडदा पाडु अशा आम्हाला धमक्या दिल्या.

त्यावेळी दत्तात्रय साळुंके याचे चारचाकी गाडीवर तलवार कोयते मारून काचा फोडून गाडीचे नुकसान केले आहे. तरी वरील लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांचे हातातील तलवार, गोयता, रॉड, काठीने मला जीवे ठारमारण्याचे उद्देशाने मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच माझे सोबतचे लोकांना मारहाण करुन जखमी केले आहे.तसेच चारचाकी गाडीचे नुकसान केले व शिविगाळ दमदाटी केली आहे. अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. जखमी जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here