जामखेड न्युज——
जामखेडमधील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत माऊली कोकाटे व पृथ्वीराज पाटील विजयी
शंभूराजे कुस्ती संकुल व आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने भव्य मैदान
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीने जामखेड येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यात एक नंबरची कुस्ती विशाल बनकर व माऊली कोकाटे यांच्यात झाली यात माऊली कोकाटे तसेच पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली यात पृथ्वीराज पाटील विजयी झाले.
शंभूराजे कुस्ती संकुलचे पैलवान बापू जरे विरुद्ध पै. शिवराज चव्हाण यांच्यात झाली यात बापू जरे विजयी झाले तर चौथी कुस्तीही शंभूराजे कुस्ती संकुलचे पैलवान चिराग आजबे यांनी जिंकली.
जामखेड येथील भव्य कुस्तीचे मैदानासाठी 600 पेक्षा जास्त पैलवान उपस्थित होते. भव्य दिव्य मैदानाचे आयोजन शंभूराजे कुस्ती संकुलचे मंगेश (दादा) आजबे व आमदार रोहित (दादा) पवार मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन केले होते.
कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. महाराष्ट्राच्या मातीचे आणि कुस्ती चे वेगळे नाते आहे हे जपण्याचे काम शंभूराजे कुस्ती संकुल करत आहे. राज्यात व देशात शंभूराजे कुस्ती संकुल च्या मल्लांनी आपला ठसा उमटवला आहे. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे कुस्ती संकुल गेल्या सहा वर्षापासून हे जंगी मैदान भरवले जात आहे. यात शंभूराजे कुस्ती संकुलच्या मल्लांनी आपला ठसा उमटवला आहे.
शंभू राजे कुस्ती संकुलाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून शिवजयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात येते. हे सहावे वर्षे आहे. भव्य अशा कुस्ती स्पर्धेत यावेळी महाराष्ट्रातील सुमारे ६०० नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती.
सोमवार दि. १९ रोजी १२ ते ०२ मंगेश कंन्ट्रकशन आँफिस ते श्री नागेश विद्यालयापर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आली. दुपारी दोन वाजता कुस्त्यांना सुरूवात झाली. सायंकाळी दहा वाजेपर्यंत कुस्त्यांचा थरार सुरू होता.
या हंगाम्यात कुस्ती निवेदक म्हणून प्रसिद्ध असे पै. धनाजी मदने पंढरपूर व पै दिनेश गवळी बार्शी यांनी केले.