जामखेड न्युज——
जीवनात यशस्वी होण्यास आत्मविश्वास महत्वाचा – डॉ. संजय भोरे
सनराईज शैक्षणिक संकुलात बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
जीवनात यशस्वी होण्यासाठी व उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि हे ध्येय, चिकाटी व मेहनतीने साध्य करता येते. तसेच संगत नेहमी चांगल्यांची ठेवा, निर्व्यसनी राहा हे केले तर आपले जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असा अनमोल सल्ला डॉ. संजय भोरे यांनी दिला.
सनराईज मेडिकल अँन्ड एज्युकेशन फौंडेशन जामखेडच्या पाडळी फाटा येथील शैक्षणिक संकुलाचे स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज व संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज मधील कला व विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या मुलांचा निरोप समारंभ मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डॉ. भोरे बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय भोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून कॉलेजच्या प्राचार्या तथा संस्थेच्या सचिव श्रीमती अस्मिता जोगदंड( भोरे)मॅडम उपस्थित होते,
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याच बरोबर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक बहीर सर, आयकर सर, यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या श्रीमती जोगदंड मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून येणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित प्रा.तेजस भोरे,प्रा.कसाब सर,प्रा.भोंडवे सर,प्रा. दादासाहेब मोहिते सर,प्रा.कदम सर,प्रा.पवार मॅडम,अविनाश भोरे,तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचा विद्यार्थी सुजित नवसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.मोहिते सर यांनी केले.