जामखेड न्युज——
विविध समस्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन, लवकरच समस्यांचे निराकरण करण्याची प्रशासनाची लेखी हमी – अँड डॉ. अरूण जाधव
विविध सामाजिक, शैक्षणिक, रस्ते, देवस्थान, आरोग्य विषयक समस्या बाबत आज अँड डॉ. अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने लेखी देत लवकरात लवकर समस्या निराकरण केले जाईल असे सांगितले.
बोंबाबोंब आंदोलनामुळे समस्या निराकरण होणार आहे असे अँड. डॉ. अरूण जाधव यांनी सांगितले.
आज दिनांक 15 /2/ 24/ रोजी जामखेड तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. जामखेड तालुका येथील खर्डा गावातील पीर देवस्थान मंदिराचे डागडुजी होणे बाबत तसेच खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्र व शिऊर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये तातडीने डॉक्टर उपलब्ध करून सुविधा देऊन चालू करणे तसेच दिघोळ ते खर्डा रस्त्याचे मजबूतीकरण होणे यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये दिघोळ ते खर्डा जो रस्त्याचे काम अधुरे राहिले आहे ते आठ दिवसांमध्ये चालू करून पूर्ण पण होईल असे लेखी पत्र तहसीलदार साहेब यांनी दिले. खर्डा कानिफनाथ पीर देवस्थान पडझड झालेली आहे. ती येणाऱ्या यात्रेपर्यंत काम पूर्ण होईल तसेच खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एका महिन्यामध्ये उद्घाटन करून तिथल्या सुविधा पूर्ण होतील अशी लिखित पत्र दिले जामखेडचे नायब तहसीलदार साहेब भोसेकर यांनी लिखित पत्र दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे भटके विमुक्त आदिवासी आघाडी राज्य समन्वयक ॲड.अरुण आबा जाधव म्हणाले की, निवेदनात दिलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्या संदर्भात लिखित स्वरूपामध्ये पत्र दिले आहे त्यामुळे तातडीने काम पूर्ण करावे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळामध्ये या विषयाला घेऊन व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी लोकअधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, सामाजिक कार्यकर्त्या उमाताई जाधव, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, लोकअधिकार आंदोलन संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक नंदकुमार गाडे,वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे त्याचबरोबर वैजिनाथ केसकर, भीमराव सुरवसे, राजू शिंदे, रजनी आवटे, ऋषिकेश गायकवाड, शहानुर काळे,आलेस शिंदे, सुनील काळे,मोहम्मद मुजावर शेकचंद, मुजावर मुबारक, मुजावर बाबा,मुजावर नजीब, मुजावर हमीद भाई, मुजावर इब्राहम, मुजावर निजाम,मुजावर खलील,मुजावर इस्माईल, मुजावर मन्सूर, सलीम मदारी, मुस्तफा मदारी, फकीर मदारी, हुसेन मदारी,जावीद मदारी, मोहम्मद मदारी,असलम मदारी, आबा साळवे असे सर्व बहुसंख्येने उपस्थित होते.
अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे यांनी दिली.