मयत अदिवासी तरूणाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणारच – अँड. डॉ. अरूण जाधव

0
295

जामखेड न्युज——

मयत अदिवासी तरूणाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणारच – अँड. डॉ. अरूण जाधव

खर्डा येथे अपघातात मरण पावलेल्या आदिवासी समाजाच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मी प्रयत्न करणार आणि मयत कुटुंबाला न्याय मिळवून देणारच असे अँड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले
ते अपघातात मयत झालेल्या काळे कुटुंबीयांच्या सांत्वन भेटीसाठी आल्यानंतर विधान केले.


खर्डा येथील सीताराम बाबा चौकात २७ रोजी दुपारी ३:३० वाजता आदिवासी समाजातील दोन युवक मोटर सायकल वरून मजुरीचा कामासाठी जात असताना एसटी महामंडळाच्या कळंब डेपो च्या गाडीने भरधाव वेगाने धडक दिली होती. यामध्ये तरुण सोनू अनिल काळे हा जागीच ठार झाला असून व दुसरा तरुण जखमी झालेला आहे. तो जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी औषध उपचार घेत आहे त्याची परिस्थिती देखील चिंताजनक आहे यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनी जानकर साहेब यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन संबंधित एसटी चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी समाज या ठिकाणी अपघाताचा गुन्हा दाखल करत नसल्यामुळे काही काळापुरते वातावरण तंग झाले होते मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या मांडून बसले होते यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडते का काय अशी शंका निर्माण झाल्यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व जामखेड तहसीलदार योगेशजी चंद्रे यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या व या समुहा बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या वरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कसोटीने प्रयत्न केले संबंधित एसटी चालकावरती अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे भविष्यात या कुटुंबाला न्याय मिळवून देणारच असे अँड अरुण जाधव यांनी सांगितले.


आंदोलन मागे घेण्यासाठी व एस टी ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्यासाठी विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे,आतिश पारवे,भीमराव सुरवसे,बबलु सुरवसे,मधुकर पवार,लहू पवार इत्यादींनी प्रयत्न केले.

यावेळी माजी सरपंच संजय गोपाळघरे आदिवासी युवक,युवती व खर्डा परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

या परिवाराला अँड. डॉ. अरुण(आबा)जाधव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य समन्वय.यांनी आज दिनांक २९ डिसेंबर रोजी भेट देऊन संत्वन केले, व पाठीशी खंबीर उभे राहण्याची हमी दिली अशी माहिती आदिवासी नेते मधुकर पवार यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here