जामखेड न्युज——
विविध गुणदर्शन स्पर्धेत दत्तवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कडून विशेष कौतुक
जामखेड तालुक्यातील दत्तवाडी शाळा म्हणजे एक आदर्श शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी शाळा नेहमीच अग्रेसर असते. केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक अशा तब्बल दहा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी जि.प.प्रा. केंद्रशाळा नान्नज येथे उत्साहात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी(धोंडपारगाव) येथील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेची सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम ठेवली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या मा.श्री. श्रीम.शितल काळे मॅडम व मा.श्री.हरिदास पावणे सर या आदर्श शिक्षकांचे तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब,नान्नज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.सुनील जाधव साहेब,नान्नजचे केंद्रप्रमुख मा.श्री.राजेंद्र त्र्यंबके साहेब ,धोंडपारगावचे सरपंच मा.श्री.बळीराम शिंदे,उपसरपंच मा.श्री.दत्ता शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुशिलकुमार धुमाळ, उपाध्यक्ष मा.श्री.दिपक शिंदे यांनी अभिनंदन केले असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्र देऊन लवकरच भव्य सत्कार करण्याचे तसेच जिल्हास्तरावर यश मिळवणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल फी रोख बक्षीस म्हणून देण्याचे जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे सध्या कार्यरत असलेले दत्तवाडी शाळेचे माजी शिक्षक मा. श्री.मनोहर इनामदार सर यांनी घोषित केले आहे.
विविध स्पर्धांत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे
वक्तृत्व स्पर्धा
श्रेया अप्पासाहेब साळवे इ.१ली किलबिटात तृतीय
शंभूराज विकास शिंदे इ.४थी
-बाल गटात प्रथम .
उत्कर्षा अनंता भांडवलकर इ.५वी
– किशोर गटात प्रथम.

——————————————–
वैयक्तिक गायन स्पर्धा
सई लक्ष्मण झांजे इ.४थी बालगटात द्वितीय
राम जयहिंद काकडे इ.५वी
– किशोर गटात प्रथम
———————————————-.
वेशभूषा स्पर्धा
सई लक्ष्मण झांजे इ.४थी
-बाल गटात प्रथम .
वैष्णवी दीपक शिंदे इ.५ वी किशोर गटात द्वितीय
———————————————-
गोष्ट/कथा सादरीकरण स्पर्धा
सई लक्ष्मण झांजे इ.४थी
बाल गटात प्रथम
आदित्य बळीराम शिंदे इ.५वी किशोर गटात द्वितीय
———————————————-
हस्ताक्षर स्पर्धा
श्रेया अप्पासाहेब साळवे इ.२री किलबिल गटात तृतीय
सई लक्ष्मण झांजे इ.४थी
बालगटात प्रथम
उत्कर्षा अनंता भांडवलकर इ.५वी
-किशोर गटात प्रथम
———————————————-
समूहगीत गायन स्पर्धा
लहान गट (इ.१ली ते ४थी)-प्रथम
मोठा गट (इ.५वी ते ७वी)-प्रथम
———————————————-
सांस्कृतिक स्पर्धा
लहान गट(इ.१ली ते ४थी)-प्रथम मोठा गट (इ.५वीते ७वी)-द्वितीय
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा