जामखेड न्युज——
जामखेडच्या गायत्री भूषण राळेभात यांची पीएसआय पदी निवड
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव राळेभात यांचे चिरंजीव भुषण व सुनबाई गायत्री हे दोघेही उच्चशिक्षित असुन भुषण नामदेव राळेभात यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी व्हिएतनाम येथे निवड झालेली आहे तर गायत्री यांची मलेशिया येथे एक महिन्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देखील निवड झाली होती. आता गायत्री भूषण राळेभात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा मध्ये PSI पदी निवड झाली आहे. गायत्री या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विस्तार विषयामध्ये आचार्य पदवीचे पीएचडी शिक्षण घेत आहेत. गायत्री यांची मलेशिया येथे एक महिन्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देखील निवड झाली होती.
गायत्री यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांनी कृषी क्षेत्रात शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विस्तार विषयामध्ये पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला.
गायत्री भूषण राळेभात यांचा दृष्टीकोन खूप व्यापक आहे. त्यांना शेतीव्यतिरिक्त पर्यावरण, हवामान बदल यासारख्या विषयांमध्ये देखील रस आहे. त्या या विषयांवर सतत अभ्यास करत असतात. गायत्री यांची मलेशिया येथे एक महिन्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
या प्रशिक्षणामध्ये त्यांना मलेशिया येथील कृषी विद्यापीठात हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम, जलव्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान, जैवविविधता संवर्धन या विषयांवर प्रशिक्षण केले होत.
गायत्री भूषण राळेभात यांची एमपीएससी परीक्षात PSI पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलींसाठी प्रेरणादायी ठरण्याचे वचन दिले आहे.
श्रीयूत भुषण नामदेव राळेभात यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी व्हिएतनाम येथे निवड
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापणाचे आधुनिक कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रकल्पांतर्गत स्मार्ट शेती वर आधारित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील आचार्य पदवी (पीएचडी) चे जामखेड चे विद्यार्थी मा. श्रीयुत भुषण नामदेव राळेभात यांची कॅन थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम येथे एक महिन्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
गायत्री यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.