जामखेड न्युज——
विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ म्हणजे विज्ञान प्रदर्शन- बाळासाहेब धनवे
विज्ञान प्रदर्शन (Science Fair) हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे, त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर आपल्या शाळेचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जे जमते त्याच्यावरच विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावे विज्ञान व तंत्रज्ञान हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून विज्ञानाची सर्वांनी कास धरावी, जय-जवान, जय-किसान व जय विज्ञानच्या भरभराटीसाठी सर्वानीच प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी केले.
48 वे जामखेड तालुका गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन श्री नागेश विद्यालय उत्साहात संपन्न. रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती, जामखेड तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 48 वी जामखेड तालुका विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले. दिनांक 20 ,21 व 22 या तीन दिवशी हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले आहे . कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन करून सुरुवात केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर राळेभात, विनायक राऊत, प्रकाश सदाफुले, शिवाजीराव ढाळे, बाजीराव गर्जे, प्रवीण गायकवाड, दशरथ कोपनर, नवनाथ बडे, सुरेश मोहिते, भाऊसाहेब इथापे, भरत लहाने, आप्पा शिरसाठ ,श्रीधर जगदाळे, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के, प्रा. कैलास वायकर, प्राध्यापक विनोद सासवडकर, शिव सोळंके ,सचिन मोकाशी, निकम महाराज , कुंडल राळेभात ,राजेंद्र गोरे , मोहन पवार , अमोल गिरमे, संतोष ससाने ,साळुंखे बी एस, रघुनाथ मोहोळकर,संजय हजारे, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले ,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बी. के. यांनी केले.
यावेळी शिवाजीराव ढाळे, श्रीधर जगदाळे हरिभाऊ बेलेकर, प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री नागेश विद्यालय येथील सर्व स्टाफ यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन संभाजी इंगळे, स्वाती अभंग आभार प्रदर्शन संतोष ससाणे यांनी केले.