जामखेड न्युज——
साकत घाटात बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये घबराट
पंधरा दिवसांपुर्वी सौताडा परिसरात एका पर्यटकाच्या चारचाकी गाडीला बिबट्या आडवा आला होता नंतर आठ दिवसांपूर्वी भुतवडा येथे एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. यानंतर रात्री साकत घाटात बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.
पंधरा दिवसांपुर्वी अशोक दहिफळे यांच्या चार चाकी गाडीला बिबट्या आडवा आला होता नंतर आठ दिवसांपुर्वी लहु डोंगरे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता यात शेळी गंभीर जखमी झाली होती.
यानंतर आज साकत येथील शत्रुघ्न वराट हे जामखेड येथे एका खासगी बँकेत नोकरीस आहेत आपले बँकेचे कामकाज आटोपून रात्री साडेआठ नऊ वाजता जामखेड वरून मोटारसायकल वर साकतला चालले होते तेव्हा घाटात त्यांना गाडीच्या उजेडात रस्त्यावर बिबट्या दिसला ते खुपच घाबरले तेवढ्यात समोरून एक चारचाकी गाडी आली तेव्हा तर प्रकाशात तो अधिक स्पष्ट दिसला. चारचाकी गाडीमुळे वराट यांना धीर आला व ते गाडी तेथेच ठेवून चारचाकी गाडीने घाटाखाली आले. आपल्या मित्रांना बोलावले व साकतला जाणाऱ्या गाड्या थांबवून सर्व जण परत बरोबर गेले.
जामखेड वरून साकतला मोटारसायकल वर ये जा करणारे अनेक प्रवासी आहेत रात्रीही अनेक जण एकटे ये जा करतात तसेच सध्या ज्वारी पिकास पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते.
तेव्हा वनविभागाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सौताडा, भुतवडा, तसेच डोंगर पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. कधी वन्य प्राण्यांवर उपजीविका करतात पण वन्य प्राणी मिळाले नाहीत तर जंगलाच्या बाजूला चरत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर महिन्यांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.