आमदार किशोर दराडे यांच्या मागणीला यश, शिक्षकांना आपल्या सोयीनुसार पगार खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडता येणार

0
517

जामखेड न्युज——

आमदार किशोर दराडे यांच्या मागणीला यश, शिक्षकांना आपल्या सोयीनुसार पगार खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडता येणार

 

अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे विधानपरिषदेत आक्रमकपणे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांनी विधानपरिषदेत केलेल्या मागणी नुसार महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आता त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या पसंतीच्या राष्ट्रीय कृत बँकेत पगाराचे खाते उघडता येतील असा निर्णय सरकारने घेतला आहे विशेषत अहमदनगर व जळगाव सह अनेक जिल्ह्यांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना याचा फायदा होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील व जळगाव जिल्ह्यातील शिक्षक बंधु भगिनींनी वारंवार पाठपुरावा केल्याने शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत मागणी केली होती यानुसार आता शिक्षकांना आपल्या पसंतीच्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडता येणार आहे. असा निर्णय सरकारने घेतला आहे.

आमदार किशोर दराडे नगर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना अनेक शिक्षकांनी आपापल्या प्रलंबित मागण्या केल्या होत्या. यात सर्वात महत्वाची मागणी म्हणजे नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत अशी मागणी केली होती.


नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार आगोदर राष्ट्रीयकृत बँकेत होते पण जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून जिल्हा सहकारी बँकेत वर्ग केले होते. याबद्दल शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. हिच शिक्षकांची मागणी आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत आक्रमक पणे मांडली होती या मागणीला यश मिळाले आहे.


उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करावेत व तत्काळ त्याचा शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी लोकप्रिय शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात केली होती यानुसार सरकारने आज आदेश काढला आहे.

या दोन्ही जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार सद्या जिल्हा बँकेत होतात.परंतु जिल्हा बँक शिक्षकांना कोणत्याही सुविधा देत नाही अथवा विमाही काढत नाही.याउलट राष्ट्रीयकृत बँक शिक्षकांचा विमा काढून इतर अनेक सोयी-सुविधांचा लाभ देतात…काही अपघात-आपत्ती झाल्यास २५ ते ५० लाख रुपयांपर्यंत राष्ट्रीयकृत बँका त्यांना विमा भरपाई देतात. म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेत असावेत अशी मागणी होती.

राष्ट्रियकृत बँका होम लोन, वाहन लोन कमी व्याजदरात देतात… तसेच एटीएम च्या माध्यमातून हवे तेथे पैसेही काढण्याची सुविधा मिळते…
जिल्हा बँकेत शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी अनेक चकरा मारायला लागतात.

विविध ऑनलाइन सुविधा,एटीएम कार्ड सुविधा जिल्हा बँकेत उपलब्ध नाही. त्यामुळे मी जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार राष्ट्रकृत बँकेत होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी मी हा विशेष उल्लेख करत असल्याची मागणी आमदार दराडे यांनी सभागृहात करून शासनाचे लक्ष वेधले होते यानुसार त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here