अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार – शिक्षणमंत्री 

0
296
जामखेड न्युज – – – 
 कोरोनामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात लावण्यात येईल. त्यानंतर  अकरावीच्या  प्रवेशासाठी  प्रवेश परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या ट्विटनुसार इयत्ता दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. अकरावीची दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये  प्रवेश घ्यायचा आहे. त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.
     परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
या परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरले आहे. त्यांच्याकडून सीईटीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही, त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.
दरम्यान कोरोनाची तिसरी लाट जुलैमध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा ऑफलाइन मग कशी घेतली जाणार असा सवाल पालकांमधून समाज माध्यमांद्वारे उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here