जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
लिंब, पिंपळ, वड ही झाडे शंभर टक्के ऑक्सिजन देतात व दीर्घ आयुष्यमानाची आहेत. या झाडांची लागवड व संवर्धन केल्यास शिवाराचे पर्यावरण चांगले राहून पाऊसमान वाढते. त्यामुळे शासनाने हेरिटेज ट्री योजना नागरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातही लागू करावी, असे
प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व बावी गावचे पर्यावरण समितीचे अध्यक्ष प्रा. आ.य. पवार यांनी केले.
वटपौर्णिमेनिमित्ताने पर्यावरण समितीच्या वतीने गट.नं
१५० मधील साठ वर्षे वयाच्या वटवृक्षाची पूजा सरपंच निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच प्रा.आ.य.पवार व उपसरपंच दादा मंडलिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात प्रा. पवार यांनी विचार मांडले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पवार, लियाकत सय्यद,इमाम पठाण, बाळासाहेब कवादे, दशरथ पाटील, संतोष पवार, सचिन चिकणे, अशोक शिंदे, महादेव कारंडे,राम पवार, अशोक राऊत, फारूख पठाण, सुनील कारंडे, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामसेवक बी.व्ही.फरतडे यांनी आभार मानले.