आमदार रोहित पवारांमुळे राज्य व केंद्र शासनाकडून तब्बल ४ कोटी २४ लक्ष निधीची मंजुरी – विजप्रश्न मार्गी

0
285
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
       शेतकरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आग्रही असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विजप्रश्नी पाठपुरावा करून ४ कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून आणला आहे.त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजेच्या प्रश्नातही आ.रोहित पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत मतदारसंघातील विविध कामांसाठी हा निधी मंजुर करण्यात आला आहे.शेतकरी व नागरिकांना कृषीपंप व घरगुती विजेबरोबरच वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठी विजेची आवश्यकता असते त्या अनुषंगाने आ.रोहित पवारांनी पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ११ के.व्ही दाबाच्या वीज उपकेंद्रासाठी वीज वितरण कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावर वेळोवेळी बैठका घेतल्या.या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर स्थानिक पातळीवरच कामे निश्चित केली जातात. शासनस्तरावर ही कामे प्रस्तावित केली जाऊन राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो.मात्र निधीच्या उपलब्धतेसाठी आ.रोहित पवारांनी केलेला पाठपुरावा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे.
       कर्जत तालुक्यातील मांदळी येथील गावठाण वाहिनीच्या अलगीकरणासाठी ४३ लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला असुन मांदळीसह निमगाव व परिसरातील  गावांत गावठाण फिडरसाठी सुमारे ११ कि.मी. लांबीची नवीन उच्चदाबाची वाहिनी कार्यान्वित करण्यात आली असुन ३ नवीन रोहित्र उभारण्यात आले आहेत.यामुळे येथील नागरिकांना थ्री फेज विजेचा २४ तास पुरवठा होत आहे.कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील नवीन वीज उपकेंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यातून २ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजुर होऊन हे उपकेंद्रही कार्यान्वित झाले आहे. बाभूळगाव दुमाला येथील मोहिते वस्ती,करमनवाडी येथील खराडे वस्ती, गणेशवाडी येथील दातीर वस्ती, काळेवाडी येथील जिराफवस्ती,चिलवडी येथील नवले वस्ती, करपडी येथील मोहिते वस्ती, बारडगाव दगडी येथील घासले वस्ती, म्हाळंगी येथील जगताप वस्ती तसेच निमगाव गांगर्डा, मांदळी व निमगाव आदी गावे व वाड्या-वस्त्यांसाठी नवीन ११ रोहित्रे मंजूर करण्यात आलेली आहेत.
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील मोरे वस्ती,  पिंपळगाव आळवा येथील बारवकर वस्ती,बांधखडक येथील चव्हाण वस्ती, तेलंगशी येथील मोरे वस्ती, जवळके येथील वाळूंजकर-कांबळे वस्ती व घोडेगाव येथील तळेकर वस्तीसाठी नवीन ६ रोहित्रे मंजूर झालेली आहेत.त्यामुळे विविध भागात अनेक दशकांपासून असलेला विजप्रश्न मार्गी लागला असुन आ. रोहित पवार यांच्या या यशाचे कर्जत जामखेडमधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
*मतदारसंघातील अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न!*
          ‘मतदारसंघातील अनेक गावांत असलेल्या जीर्ण विजतारा, वाकलेले तसेच जमिनीत सडलेले खांब बदलले आहेत.शाळा व सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब दुसऱ्या ठिकाणी हलवले आहेत.ही कामे सुरू आहेतच मात्र मतदारसंघात विजेचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे.येत्या काळात हा अनुशेष भरून काढण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे’.
                             आ.रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here