जामखेड न्युज——
बाफना उद्योग समूहातर्फे Oil pearl शुद्ध खाद्यतेल नवीन व्यवसायाचा शुभारंभ
जामखेड करांसाठी अभिमानाची गोष्ट

बाफना उद्योग समूहातर्फे आतापर्यंत बाफना पॉलिमर इंडिया, जलमोती पाणी, बाफना पेट्रोलियम या उद्योगाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहेच याचबरोबर आता बाफना उद्योग समूहातर्फे Oil pearl शुद्ध खाद्यतेल नवीन व्यवसायाचा शुभारंभ दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला आहे. यामुळे जामखेडच्या उद्योगाची ख्याती आता महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही पोहचणार आहे. जामखेड करांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

oil pearl शुद्ध खाद्यतेल एडीबल ऑईल या नावाने ब्रँड आज ची आज सुरुवात झाली या मध्ये सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा, कॉटन सीड, पामोलिन असे प्रकारचे आरोग्य साठी लाभदायक व सुद्धा खाद्य तेल देण्याचा निर्धार कंपनी आज उद्घाटन वेळी केला आहे.

दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाफना उद्योग समूहातर्फे आज १४ नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या मुहूर्त Oil pearl शुद्ध खाद्यतेल या बाफना फुडस इंडिया लि. ची सुरूवात झाली आहे. खाद्य तेल एक लीटर पासून ते वीस लिटर पँकिंग मध्ये उपलब्ध आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आपल्याच परिसरातील खाद्य तेल खाण्यासाठी मिळणार आहे.

बाफना उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश बाफना यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत बाफना उद्योग समूहाने पॉलिमर इंडिया, जलमोती पाणी, बाफना बिल्डकॉन रिअल इस्टेट व्यवसाय, बाफना पेट्रोलियम या उद्योगाची दर्जा व गुणवत्तेसाठी मोठी ख्याती आहे. आणि आता खाद्य तेल उद्योग oil pearl शुद्ध खाद्यतेल नावाने सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, काँटनशिड, पामोलीन या उद्योग व्यवसायाचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला आहे.

ग्राहकांना शुद्ध खाद्यतेल खाण्यासाठी मिळणार आहे तसेच उत्तम क्लाँलीटी असल्याने ग्राहकांच्या आरोग्याची काळजी बाफना उद्योग समूहाने घेतली आहे.
उद्योग क्षेत्रातील आपल्या दर्जा व गुणवत्तेसाठी बाफना उद्योग समुहास २०२२ मध्ये पुणे याठिकाणी राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता खाद्य तेल आँईल पर्ल नावाने सुरू करत नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला आहे.

जामखेडच्या वैभवात भर
जामखेड मध्ये बाफना उद्योग समूहातर्फे आँईल पर्ल खाद्य तेल उद्योग सुरू करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरातीलच शुद्ध तेल उपलब्ध होणार आहे तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. बाफना उद्योग समूहाने जामखेडच्या वैभवात भर घातली आहे.
स्वप्नील खाडे ग्राहक जामखेड

बाफना परिवार उद्योगाबरोबरच समाजकार्यातही अग्रेसर
जामखेड येथील युवा उद्योजक आकाश बाफना यांनी आपले वडील जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप बाफना यांच्या सामाजिक कामाचा वसा व वारसा पुढे चालू ठेवला आहे. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव तसेच विविध धार्मिक तसेच सामाजिक कामात बाफना परिवार नेहमीच अग्रेसर असतो. आकाश बाफना यांनी आपल्या मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ, निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला यावेळी मुलींसाठी निवाऱ्याची अडचण लक्षात घेऊन दोन रूम बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. बाफना परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता खाद्य तेल उद्योग सुरू करत जामखेड चा नावलौकिक राज्यात नव्हे तर देशात निश्चितच करणार आहेत.





