जामखेड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर अरणगावमध्ये विहिरीत बिबट्या

0
1351

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर

अरणगावमध्ये विहिरीत बिबट्या

 

 

मागील एक दोन वर्षांपूर्वी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर होता. अनेक पाळीव प्राणी फस्त केले होते. एखादा तर धामणगाव येथे एका विहिरीत मृत बिबट्या सापडला होता. आता बरेच दिवस बिबट्या विषयी काहीही सुगावा नव्हता बऱ्याच दिवसांनंतर तालुक्यातील अरणगाव मध्ये तात्याराम निगुडे यांच्या विहिरीत बिबट्या दिसून आला आणि गावकऱ्यांची एकच धावपळ उडाली.

अरणगाव येथील निगुडे वस्ती येथे नवनाथ श्रीरंग पारे यांच्या यांच्या शेतातील पन्नास फूट खोल विहिरीत बिबट्या पडला होता विहिरीत पंधरा फुटापर्यंत पाणी आहे. तो जिवंत होता तो कपारीत दडून बसला होता. कदाचित भक्षाच्या मागे धावत असताना तो पडला असावा.

घटनेची माहिती कळताच अरणगावचे सरपंच लहु शिंदे, अंकुश शिंदे, उपसरपंच आप्पा राऊत, ग्रामपंचायत सदस्य तात्याराम निगुडे, रमजान शेख, गोवर्धन राऊत, कैलास निगुडे, कैलास म्हस्के, अर्जुन निगुडे, विष्णू निगुडे व गावकरी यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व बिबट्या पाहून वनविभागास संपर्क केला उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांच्याशी संपर्क केला वनविभागाने तातडीने पिंजरा घेऊन घटना स्थळी धाव घेतली. यावेळी वनविभागाचे वनरक्षक आजीनाथ भोसले, वनसेवक संजय अडसूळ, शरद सुर्यवंशी, बबन महारनवर यांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला.

काही दिवसांपूर्वी तालुक्यात बिबट्याचा तालुक्यात अनेक ठिकाणी वावर होता. बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा बिबट्या विहिरीत पडलेला दिसून आला आहे. वनविभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून बिबट्याचा वावर असलेल्या परिसरातील सोडून देण्यात येणार आहे.


बिबट्या परत तालुक्यात दिसल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

वनविभागाचे उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अंधारात फिरू नये, उजेड असावा तसेच हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here