श्री नागेश विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ व गरजू अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

0
184

जामखेड न्युज——

श्री नागेश विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ व गरजू अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना 100 रग ( ब्लॅंकेट) वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्रजी कोठारी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, स्कूल कमिटीचे सदस्य हरिभाऊ बेलेकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात,उद्योजक विनायक राऊत, डॉ सागर शिंदे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, प्रा राहुल अहिरे, बिबीशन परखड , प्राचार्य मडके बी के, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के ,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, रघुनाथ मोहोळकर साळुंखे बी , वस्तीगृह अधिक्षक शिर्के , एस, एन सी सी ऑफिसर मयूर भोसले,सोमीनाथ गर्जे, संतोष पवार, प्रा विनोद सासवडकर,प्रा केलास वायकर, ज्योती पालकर, सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.

एन एम एम एस , शिष्यवृत्ती , क्रीडा विभाग यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

विद्यार्थी वसतीगृहास 100 ब्लॅंकेट वाटप …

आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश विद्यालय चे स्कूल कमिटीचे सदस्य रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नागेश विद्यालयातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शंभर रग (ब्लॅंकेट )वाटप करून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली विद्यालय व वस्तीगृहातर्फे राजेंद्र कोठारी यांचा सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 

बारा अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणारे डॉ सागर शिंदे

डॉ सागर कुंडलिकराव शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय येथील 86 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले होते व या वर्षी 12 अनाथ विद्यार्थ्यांना गणवेश दप्तर,वह्या सर्व शैक्षणिक साहित्य वितरित करून परीक्षा शुल्काचा दहा हजार रु चा चेक विद्यालयाकडे सुपूर्त केला.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविकामध्ये प्राचार्य मडके बी के यांनी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवा समारंभ त्यांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित केला. असे मनोगत व्यक्त केले.
विनायक राऊत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा .
हरिभाऊ बेलेकर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार गरजवंत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केल्याबद्दल अभिनंदन केले. राजेंद्र कोठारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रा मधुकर आबा राळेभात यांनी नागेश विद्यालय चे नाव देश पातळीवर विद्यार्थ्यांनी उंचावले व विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध केले अश्या विद्यार्थ्यांना सन्मान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले राजेंद्र कोठारी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप केले असे मनोगत व्यक्त केले.

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मनोगत मध्ये ग्रामीण भागातील बहुजनांना शिक्षणाची संधी नव्हती त्यावेळेस कर्मवीरांनी शिक्षणाचे रोपटे लावले आज त्याचा वटवृक्ष झाला आहे त्या रयत शिक्षण संस्थेचे माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी उत्कृष्ट यश संपादन करतात ही आनंदाची बाब आहे पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व जि प शाळांचे 100 वॉल कंपाऊंड तयार करण्याचा संकल्प आम्ही केला आहे
मोठ्या प्रमाणात गुणवंत विद्यार्थ्यांनी बक्षीस घेतली त्यामागे शिक्षकांची मेहनत आहे हे नाकारता येणार नाही . प्राथमिक शिक्षकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे मनोगत व्यक्त करून राजेंद्र कोठारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचल संभाजी इंगळे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक कोकाटे व्ही के यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here