शिवाजीनगर महिला मंडळाने महिलांच्या कलागुणांना संधी दिली – ज्योती बेल्हेकर भव्य दांडिया कार्यक्रमाचे आयोजन

0
653

जामखेड न्युज——

शिवाजीनगर महिला मंडळाने महिलांच्या कलागुणांना संधी दिली – ज्योती बेल्हेकर

भव्य दांडिया कार्यक्रमाचे आयोजन

 

जामखेड शहरातील शिवाजीनगर भागातील महिला मंडळानी नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करत शहरातील महिलांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील मोठ्या प्रमाणात महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. यामुळे धावपळीच्या जीवनात महिलांचे चांगले मनोरंजन व विरंगुळा मिळाला आहे असे मत महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी सांगितले.


शहरातील शिवाजीनगर महिला गृपच्या वतीने मयुर टेकाळे व शितल टेकाळे यांनी भव्य दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यांना सहकार्य म्हणून माधुरी क्षिरसागर, दिपाली दळवी, कुसुम वराट, मानसी जरे या मदत करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून भव्य दांडिया कार्यक्रम सुरू आहे. याच बरोबर महिलांसाठी वेगवेगळ्या गेम आयोजित करण्यात येतात व विजेत्यांना बक्षीसेही दिले जातात. यासाठी शहरातील काही प्रायोजक आहेत. शिवम स्टोअर्स तर्फे थर्मास बाँटल विजेत्या प्रमिला पोकळे, तर साईबाबा इलेक्ट्रिकल्स तर्फे मिक्सर च्या विजेत्या वैष्णवी बारस्कर ठरल्या तसेच २३ व २८ तारखेला वेगवेगळ्या मनोरंजन गेम घेतल्या जातील विजेत्यांना योग्य बक्षिसही मिळेल.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर म्हणाल्या की, सध्या खूपच धावपळीचे युग आहे. यातही महिलांचा दिवसभर सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत घरात राब राब सुरू असतो. यातून स्वतः साठी या कार्यक्रमाच्या रूपाने वेळ काढता आला हे काम शिवाजीनगर महिला मंडळानी केले याबद्दल महिला मंडळाचे आभार मानले.

कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असतात आणि दांडिया व वेगवेगळ्या गेमचा आनंद घेतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली व स्वाती सरडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here