जामखेड न्युज——
माजी सरपंचाच्या पाठपुराव्यामुळे नगर शेळगाव बस सुरळित सुरू
अनेक महिन्यापासून जुनी शेळगाव नान्नज ते अहमदनगर ही बस जामखेड आगारकडून बसेसच्या कमतरतेमुळे चालविण्यात येत नव्हती . दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी जामखेड आगार प्रमुख जगताप यांना माजी सरपंच निलेश पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. निवेदनाची दखल घेत तात्काळ दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून शेळगाव नान्नज ते अहमदनगर ही बस पुन्हा सुरु केली व येथून पुढे ही बस सुरळीत सुरू राहील याची ग्वाही दिली.
तरी सर्व प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे, ही बस अहमदनगर मिरजगाव, महिजळगाव , अरणगाव , फक्राराबाद, बावी नान्नज जवळा मार्गे शेळगाव येथे जाते. अहमदनगर वरून दुपारी 4 वाजता व शेळगाव वरून सकाळी 6:45 वाजता सुटते. पुन्हा एकदा बावी गावचे माझी सरपंच निलेश पवार यांनी जामखेड आगार प्रमुख जगताप साहेब याचे मनपूर्वक आभार मानले.
बावी सरपंच निलेश पवार माजी सरपंच निलेश पवार यांच्या पाठपराव्यामुळे जूनी शेळगाव नगर बस सुरळित सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.