जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचा ठेकेदार मंत्र्यापेक्षा मोठा आहे का ? आमदार रोहित पवारांचा सवाल!!! राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडे बोल

0
802

जामखेड न्युज——

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचा ठेकेदार मंत्र्यापेक्षा मोठा आहे का ? आमदार रोहित पवारांचा सवाल!!!

राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडे बोल

 

शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन एका वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी रस्त्याचे काम अंत्यत संथ गतीने सुरु असून अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांना या रस्त्यामुळे आरोग्य समस्यांसह प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याबाबत आमदार रोहित पवार राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडे बोल सुनावत रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निधी देऊनही कामाला उशीर होत असल्याने कंत्राटदार मंत्र्यापेक्षा मोठा आहे का ? असा थेट सवाल करत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ५४८ डी साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ८६.९ कोटी रुपये मंजूर केले असून ईपीसी कंत्राटदार,धनेश्वर कन्ट्रक्शन,गणेश कन्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी या महामार्गाचे काम घेतले असून फेब्रुवारी मध्ये खासदार डॉ सुजय विखे,आमदार राम शिंदे यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते या कामासाठी आठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला असून याच कालावधीमध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित असताना गेल्या ९ महिन्यामध्ये शहरातील रास्ता खोदून मातीमिश्रित मुरूम टाकला आहे,रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत.


त्यामुळे येथे मोठया प्रमाणावर धुळ उडते आहे. धुळीमुळे रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. धुळीतून मार्गस्थ व्हावे लागत असल्याने दमा, खोकला, सर्दी आणि श्वासनांच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने सतत उठणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्गाकडे करून अद्याप पर्यंत दाखल घेतली गेली नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पाच्या प्रमुख स्मिता पवार यांच्याशी फोन व्दारे संपर्क करून खडे बोल सुनवत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निधी देऊनही कामाला उशीर होत असल्याने कंत्राटदार मंत्र्यापेक्षा मोठा आहे का ? असा थेट सवाल करत या महामार्गाचा कामात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी फक्त गोड बोलून दिशाभूल करण्याचे काम करत असून या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

जामखेड परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवला आहे याबाबत काय तो निर्णय घ्या नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा आ रोहित पवार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे आ रोहित पवार यांनी लक्ष दिल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून रस्त्याचे लवकरात लवकार मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here