पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या भूमिकेत नगरची शमीम अली

0
381

जामखेड न्युज—–

पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या भूमिकेत नगरची शमीम अली

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘देवी अहिल्याबाई’ या हिंदी नाटकात अहिल्याबाईची मध्यवर्ती भूमिका मूळची नगरची असलेली अभिनेत्री शमीम अली साकारत आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्ष आहे. हे औचित्य साधत भोपाळ येथील अनिल दुबे यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले ‘देवी अहिल्यादेवी’ हे नाटक रंगमंचावर येणार आहे. त्याचं लेखन अनिल दुबे आणि कविता गांधी यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन उमेश तरकसवार यांचे आहे. मार्गदर्शक जयंत देशमुख असून कविता राजेश शुक्ला यांच्या आहेत.

प्रकाश संयोजन घनश्याम गुर्जर यांचे असून युद्धकला व नृत्य संयोजन राजकुमार रायकवार यांनी केलं आहे.

नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल अॉफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलेल्या नगरच्या शमीम शेख – अली या नाटकात अहिल्याबाईंची प्रमुख भूमिका साकारत आहे. तिने यापूर्वी हिंदी चित्रपटांत आणि नाटकांत विविध भूमिका केल्या आहेत.

या नाटकाचा प्रयोग विक्रम नाट्य महोत्सवात २१ मार्चला संध्याकाळी सात वाजता मध्यप्रदेशातील उज्जैन येथील कालिदास अकादमीत झाले असून त्याला भरघोष अशा प्रतिसाद मिळत आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई वरील विशेष मालिका सध्या ‘रेडिओ नगर ९०.४ एफएमवर दर रविवारी सुरु आहे. डाॅ. देवीदास पोटे लिखीत या मालिकेत अभिनेत्री शमीम अली हिच्या आवाजात ‘देवी अहिल्यादेवी’ नाटकातील काही संवादही प्रसारित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here