जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये तनश्री पोले प्रथम विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
388

जामखेड न्युज——-

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये तनश्री पोले प्रथम

विभागीय स्पर्धेसाठी निवड

 

आंबेजोगाई येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सतरा वर्षे वयोगटांमध्ये कुमारी तनश्री पोले हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. व जालना येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.

विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक तसेच प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले, क्रीडा शिक्षक अजीम शेख, राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, अनिल देडे, विजय क्षिरसागर यांच्या सह अनेक मित्रमंडळी, कुटुंबीय व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तनुश्री ही इयत्ता नववीच्या वर्गात अनिशा ग्लोबल आष्टी येथे शिकत असुन जिल्हास्तरावर गोल्ड मेडल जिंकल्यामुळे जालना येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तिच्या यशामुळे जामखेड, आष्टी व करमाळा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here