सारोळा रस्त्यावरील झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू, जामखेड परिसरात एकच खळबळ

0
3420

जामखेड न्युज ——

सारोळा रस्त्यावरील झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू, जामखेड परिसरात एकच खळबळ

 

शहरापासून जवळ असलेल्या सारोळा रोडवर मयत
सतिश छगन झेंडे रा. निमोणकर वस्ती (वय ३४ ) यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.


मयत सतिश छगन झेंडे रा. निमोणकर वस्ती (वय ३४) हा आज दि. ३ आँक्टोबर रोजी दुपारी तीन च्या सुमारास जामखेड वरून जमादारवाडी या ठिकाणी चालला होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. बऱ्याच वेळा नंतर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात आले तेव्हा तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मयत घोषित केले.


मयत सतिश छगन झेंडे यांचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी केले. मयत झैंडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले आई वडील सासू सासरे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here