आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साकेश्वर विद्यालयात राइटिंग पँड वाटप व गुणवंत मुख्याध्यापक सत्कार संपन्न

0
454

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साकेश्वर विद्यालयात राइटिंग पँड वाटप व गुणवंत मुख्याध्यापक सत्कार संपन्न

 

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच विविध सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी उपक्रम राबविले जातात या वर्षी कर्जत जामखेड तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलांना राइटिंग पँड वाटप करण्यात आले. आज श्री साकेश्वर विद्यालयात पँड वाटप कार्यक्रम व विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी साकतचे उपसरपंच राजाभाऊ वराट, सेवा सोसायटीचे संचालक गणेश वराट, ज्ञानदेव मुरूमकर, विकास सुळे, संतोष सुळे, अशोक वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, अण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना राइटिंग पँड मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत कर्जत जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना दहा हजार सायकली वाटप तसेच, राइटिंग पँड, कंम्पास, किंडर जाँय चॉकलेट असे विविध उपक्रम राबविले जातात. तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना राइटिंग पँड वाटप करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here