जामखेड येथील मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण महासभेसाठी ४ रोजी नियोजन बैठक बैठकीमध्ये ठरणार मराठा आरक्षणाचा रोड मॅप

0
526

जामखेड न्युज—— ( सुदाम वराट) 

जामखेड येथील मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण महासभेसाठी ४ रोजी नियोजन बैठक

बैठकीमध्ये ठरणार मराठा आरक्षणाचा रोड मॅप

 

 

६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता जामखेड येथील तहसील कार्यालया समोर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची स्वागत महासभा होणार आहे . या कार्यक्रमाची पहिली नियोजन बैठक साई गार्डन नगर रोड जामखेड २९ रोजी संपन्न झाली तर याचं ठिकाणी दि. ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता दुसरी नियोजन बैठक आोजित केली असल्याची माहिती जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.


मराठा आरक्षणावर घटनात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ४० दिवसांचा वेळ मागून घेऊन मराठा आरक्षण मागणी साठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती सरकारने केली होती त्या प्रमाणे त्यांनी उपोषण सोडले, त्या नंतर वैद्यकीय उपचार घेऊन ते महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहेत त्या नुसार दी ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महासभेचे आयोजन करण्यात आले आहे त्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.


सरकारने ४० दिवसांत जर मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण दिलं नाही तर या पुढील रोड मॅप काय असेल याची रणनीती जामखेड येथील ४ तारखेच्या नियोजन बैठकीत ठरणार आहे. मराठा समाजाचा आरक्षण लढा आता योग्य मार्गावर चालू असून फक्त राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे निर्णय होत नाही म्हणून या राजकिय इच्छाशक्तीला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी भागपडणारी रणनीती ठरणारं असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. आज पर्यंत मराठा समाजाच्या ५५ युवकांनी बलिदान दिले आहे तर ५८ च्या वर शांतेत मोर्चे काढण्यात आले, रास्ता रोको, घंटानाद , आमरण उपोषणाचे संवीधानिक मार्ग मराठा समाजाने अवलंबिले आहेत.


महाराष्ट्रात ३५ टक्क्याच्या वर मराठा समाज असून देखील आज पर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे मात्र आता योग्य नियोजन, रणनीती ठरवून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्याचा रोड मॅप जामखेड मराठा क्रांती मोर्चाने तयार केला आहे व तो महाराष्ट्रासाठी दिशा दर्शक असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. ४ ऑक्टोंबर रोजी च्या महत्वाच्या नियोजन बैठकी साठी जामखेड तालुक्यातील मराठा समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामजिक कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here