जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लर्निग प्रोग्रामच्या आॅनलाईन परिक्षा घेण्यात आल्या या परिक्षेत जामखेड शहरातील दानीया नासीर पठाण हिने ९६ गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळविले. या पुर्वीही इयत्ता चौथीत असताना दानीयाने आॅलंपियाड इंटरनॅशनल परिक्षेत देशात १२ वा क्रमांक मिळविला होता. दरम्यान पहिली ते चौथीचे शिक्षण घेत असतानाच दानीयाने विविध विषयांमध्ये ६ गोल्ड मेडल मिळविले आहेत.
राज्यस्तरीय स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लर्निग प्रोग्रामच्या आॅनलाईन परिक्षेतील यशाबद्दल दानीया हिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. दानीया पठाण हि पत्रकार नासीर पठाण यांची कन्या आहे. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून अनेक पदके जिंकली आहेत.