जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
संपुर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त व कालच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदर्श ग्राविकास प्रतिष्ठाण महारुळी -गुरेवाडी चे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढेपे व सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे यांच्या वतीने जामखेड पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत (नाना) मोरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, उपसभापती रवी सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, माजी सभापती सुभाष आव्हाड,
आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढेपे,
महारुळ – गुरेवाडीच्या सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, सहाय्यक गटविकास अधिकारी पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी बापुसाहेब माने, उपअभियंता पंचायत समिती जामखेड माने, साळवे, शिंदे, तांत्रिक अधिकारी प्रशांत शेळके, संभाजी ढोले यांच्या सह सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

प्रा. लक्ष्मण ढेपे हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात स्व:ताच्या वाढदिवसानिमित्त आरोळे कोविड सेंटरमधील रूग्णांना व स्टाफला स्नेहभोजन तसेच राज्यातील आदर्श भाळवणी येथिल आमदार निलेशजी लंके संचलित कोविड सेंटरला मदत, हरित गाव करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला घरासमोर लावण्यासाठी फळ झाड, तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ कुपनलिका व विहिरी अधिग्रहन आदेश ताबडतोब मिळावा म्हणून प्रयत्न गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न कोरोना काळात गोरगरीब कुटुंबाला किराणा किटचे वाटप अशा सामाजिक कामात ते नेहमीच अग्रेसर असतात. शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त व कालच झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.