जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
संपुर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्त जामखेडचे न्यायाधीश पी.व्ही सपकाळ यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ श्री नागेश विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
श्री नागेश विद्यालयाच्या वतीने जामखेडचे न्यायाधीश पी.व्ही सपकाळ साहेब यांची बदली जुन्नर येथे झाल्याबद्दल यांचा निरोप समारंभ व शुभेच्छा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मिनीनाथ दंडवते ,प्राचार्य बी के मडके, अॅड नितीन घुमरे , ज्येष्ठ शिक्षक प्रा अर्जुन वाघ, संजय हजारे, प्रकाश कोकाटे, बी.एस शिंदे , एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, क्रीडा शिक्षक गौतम गायवळ, पत्रकार पप्पूभाई सय्यद, अजय अवसरे, उद्धव सोनवणे, मोहन जोरे, अशोक आव्हाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून न्यायाधीश पी व्ही सपकाळ यांच्या हस्ते नागेश विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. न्यायाधीश सपकाळ यांचा साडेचार वर्ष जामखेड न्यायालयात कार्यकाळ झाला या मध्ये अनेक समाजोपयोगी कार्य केले व यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, चर्चा सत्रे, गरजू-निराधार महिलासाठी शिबिरे, लोक न्यायालयाचे उत्कृष्ट कार्य, दरवर्षी वृक्षारोपण करणे असे कार्य केले.
यावेळी न्यायाधीश सपकाळ म्हणाले की शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निरोप समारंभ घेतल्या मुळे पुढील नियुक्ती शिवरायांच्या जन्मभूमीत जुन्नर तालुक्यात आहे हा चांगला योगायोग आहे. तसेच वृक्षारोपण करून सत्कार केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी रयतचे श्री नागेश विद्यालय नेहमीच चांगले उपक्रम करत आहे व न्यायाधीश सपकाळ साहेब यांच्या निरोप समारंभ निमित्त त्याच्या हस्ते वृक्षारोपण केले तसेच सर्व नागरिकांनी वृक्षारोपण करावे असे आव्हान.
सुत्रसंचलन संजय हजारे आभार प्रदर्शन प्राचार्य बी. के मडके यांनी केले.