जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट व त्यांचे बंधू कैलास वराट यांनी आरोळे कोविड सेंटरला एक्कावन्न हजार रुपयांची मदत करत आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा चालवला आहे.
साकत येथील सेवानिवृत्त शिक्षक देवराव वराट गुरुजी यांचे पंधरा दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. गुरूजींनी हयातीत अनेक गोरगरीब कुटुंबाला मदत केली होती. परिसरातील मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे यासाठी ते आग्रही आसायचे त्यामुळे तर संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था स्थापन करून कोल्हेवाडी येथे जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले तसेच साकत घाटात श्री साकेश्वर ज्युनियर कॉलेज, साकेश्वर पब्लिक स्कूलची स्थापना करून अनेक गोरगरीब मुलांची शिक्षणाची सोय केली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले वराट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सर्व विधी पुर्ण झाल्यावर आज सामाजिक भावनेतून औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला एक्कावन्न हजार रुपयांची मदत केली.

देवराव वराट गुरुजी यांचे चिरंजीव अरुण वराट हे खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांचे स्वीय सहायक तसेच साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर कैलास वराट हेही शिक्षक आहेत. यांचे संस्थेच्या माध्यमातून सातत्याने गरजवंताना मदतीचे काम चालू असते. कोरोनाच्या महामारिमुळे सध्या सर्वजण त्रस्त आहेत.अशावेळी कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला अरूण वराट सर व कैलास वराट सर यांनी एकावन्न हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश डॉ. रवि आरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी पंचायत समितीचे सभापती संजय वराट सर,आरोळे हाँस्पीटलच्या सुलताना शेख, माजी सरपंच कांतीलाल वराट, प्रा. अरुण वराट, कैलास वराट, डॉ सुनिल वराट, पोपट वराट, महादेव वराट, अविन लहाने, नागेश वराट, यूवराज वराट, भरत लहाने, शहादेव वराट, दिलिप पोकळे, विजय वराट, विशाल वराट, प्रदिप लहाने, कृष्णा पुलावळे, बिभीषण वराट, शिवाजी कोल्हे, सचिन लहाने, दादा मेंढकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वडिलांच्या समाजसेवेचा वारसा प्रा. अरूण वराट व कैलास वराट यांनी पुढे चालवला आहे.