शेतकरी संघटनेच्या निवेदनाची दखल, नुकसानग्रस्त उडीद पिकांची कृषी विभाग करणार पहाणी नुकसानग्रस्त उडीद पिकांची माहिती कृषी विभागाला द्यावी – मंगेश आजबे

0
331

जामखेड न्युज——

शेतकरी संघटनेच्या निवेदनाची दखल, नुकसानग्रस्त उडीद पिकांची कृषी विभाग करणार पहाणी

नुकसानग्रस्त उडीद पिकांची माहिती कृषी विभागाला द्यावी – मंगेश आजबे

तालुक्यातील उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जळालेले आहे तर काही ठिकाणी पीक करपलेले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल शासनस्तरावर घ्यावी व मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगेश आजबे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते होते. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कृषी विभागाला नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या मंगळवार पासून कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त उडीद पिकांची पहाणी करणार आहेत.

 

जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उडीद पिकांखाली क्षेत्र असते या वर्षी सुद्धा खूप शेतकऱ्यांनी उडीद या पिकाची पेरणी केली आहे. मागील दहा दिवसांत काहीतरी रोगाला उडीद पीक बळी पडत असून बहुसंख्य शेतकऱ्यांची उडीद पिके ही जळून गेली आहेत किंवा जळण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे यांनी निवेदनाद्वारे दिला होता याची दखल घेत मंगळवार पासून कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त उडीद पिकांची पहाणी करणार आहेत.

निवेदनात म्हटले होते की, दुषित वातावरणामुळे उडीद पिक करपू लागलेलाऊ आहे. जळालेल्या उडीद पिकांचे पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, हा हंगाम शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये च निसर्गाने योग्य साथ दिली नाही किंवा पीक चांगले आले नाही तर शेतकरी हवालदिल होतो आणि नैराश्येच्या गर्तेत जातो,पिकावर खर्च तर झालेला असतो मग कर्जबाजारी व्हायची सुद्धा वेळ येते त्यामुळे साहेब आपण लक्ष घालून प्रशासनाला योग्य ते आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी चे प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

चौकट

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा व आपले नुकसान अधिकारी वर्गाच्या लक्षात आणून द्यावे म्हणजे कृषी विभागाचे कर्मचारी येऊन पहाणी करतील. यानुसार पुढे पंचनामे केले जातील

मंगेश (दादा) आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here