दैनंदिन आहारात तृणधान्यांचा वापर करावा- कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर तृणधान्ये जनजागृती उपक्रम नागेश विद्यालय उत्साहात संपन्न

0
153

जामखेड न्युज——

दैनंदिन आहारात तृणधान्यांचा वापर करावा- कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर

तृणधान्ये जनजागृती उपक्रम नागेश विद्यालय उत्साहात संपन्न

वैज्ञानिकांच्या मते आहारामध्ये तृणधान्याचे अतिशय महत्त्व आहे. प्रतिकारक्षमता, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी तृणधान्याचा वापर विद्यार्थ्यांनी करावा. फास्ट फूडच्या खाण्याने प्रतिकारक्षमता कमी होऊन विद्यार्थी आजारी लवकर पडतात. दैनंदिन आहारात तृणधान्यांचा वापर करावा असे कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागृती करण्याबाबतची मोहिमेचे शुभारंभ मा. गटशिक्षाधिकारी बाळासाहेब धनवे व सुनील जाधव अधीक्षक पीएम पोषण जामखेड यांच्या मार्गदर्शनाने श्री नागेश विद्यालय करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर , स्कूल कमिटी जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी, विनायक राऊत ,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष कृषी सहाय्यक अमोल बहिर, प्राचार्य मडके बी के पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , गुरुकुल प्रमुख संतोष ससाने,प्रा विनोद सासवडकर , शिंदे बी एस , संभाजी देशमुख, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

तृणधान्य प्रदर्शनाचे उद्घाटन मा राजेंद्र सुपेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे कर्तव्यदर्शक कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी मनोगत मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. नागरिकांमध्ये पौष्टिकच धान्याबद्दल जनजागृती वाढवणे आणि तृणधान्य उत्पादन अधिक वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा येतो आहे यामुळे राज्यात कृषी विभाग मार्फत उपक्रम राबवण्यात आला आहे

प्रदर्शनामध्ये अन्नप्रक्रिया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी ,राळा , वरई , कोद्रा , राजगिरा, नाचणी, ज्वारी, सावा , कडधान्य प्रकार, पौष्टिक आहार फायदे ,बाजरीचे विविध पारंपारिक पदार्थ, पोषणमूल्ये अशा विविध माहिती फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले तसेच कडधान्याचे विविध नमुना पॅकेट यामध्ये ठेवण्यात आले.

विविध कडधान्य तृणधान्यांचे प्रदर्शन पाहून विद्यार्थी आनंदित झाले. प्रास्ताविक संभाजी देशमुख, सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद सासवडकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here