जामखेड न्युज——
मोहरी येथे पुतण्याने केला चुलत्याचा खुन!!
शेतातुन गुरे घेऊन जाण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहरी गावात झालेल्या भांडणात पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुर्हाडीने घाव घालुन खुन केला. या प्रकरणी एकुण चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चार जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जामखेड तालुका पुन्हा हादरला आहे.
अशोक धोंडिबा हाळणावर वय ५३ वर्षे रा. मोहरी. ता. जामखेड यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या बाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, आज सोमवार दि ३ जुलै २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी या गावातील हाळणावर वस्ती येथिल मयत अशोक धोंडीबा हाळणावर हे सकाळी साडेअकरा वाजता आपली जनावरे चारण्यासाठी हळणावरवस्ती वरुन तेलंगशी फाटा या ठीकाणी चालले होते. यावेळी फीर्यादीचा चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हळणावर याने मयत अशोक धोंडींबा हाळणावर यांना सांगितले की तुम्ही शेतातुन गुरे घेऊन जाऊ नका आसे सांगितले त्यावर मयत आशोक हळणावर यांनी सांगितले की अजुन जमीनीचे वाटप झाले नाही हे सामाईक क्षेत्र आहे. याचाच राग आरोपी युवराज बाबासाहेब हळणावर याला आला व त्याने घरी जाऊन कुर्हाड घेऊन आला व घरातील कुर्हाडीने मयताच्या गळ्यावर व मानेवर दोन तीन वार करुन गंभीर जखमी केले. तर इतर आरोपी दत्तात्रय बाबासाहेब हळणावर, नवनाथ सिताराम हळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता. जामखेड यांनी मारहाण केली व सर्वजण घटनास्थळाहुन पळुन गेले.
या हल्ल्यात अशोक हळणावर गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने खर्डा येथिल खाजगी हॉस्पिटलला आणण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासुन त्यांना मयत घोषीत केले.
या प्रकरणी मयताचा मुलगा आनंद अशोक हळणावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी युवराज बाबासाहेब हळणावर, दत्तात्रय बाबासाहेब हळणावर, नवनाथ सिताराम हळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती,मोहरी ता.जामखेड आशा चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सपोनि महेश जानकर पो. ना. संभाजी शेंडे, पो. कॉ. वैजीनाथ मिसाळ, शशिकांत म्हस्के, आशोक बडे व बाळु खाडे यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर हे करत आहेत.