वंचित बहुजन समाजासाठी जनविकास सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलीस निरीक्षक महेश पाटील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा वाढदिवस जनविकास सेवाभावी संस्थेत साजरा

0
143

जामखेड न्युज——

वंचित बहुजन समाजासाठी जनविकास सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलीस निरीक्षक महेश पाटील

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा वाढदिवस जनविकास सेवाभावी संस्थेत साजरा

जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचा वाढदिवस जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी महेश पाटील यांचा संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार व सामाजिक कार्यकर्ते राम पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या वतीने सन 2018 पासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती व सध्या सुरू असलेल्या कामासंदर्भातील माहिती संस्थेचे समन्वयक संतोष गर्जे यांनी दिली व संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बोलताना सांगितले की, जामखेड तालुक्यातील आदिवासी, भटके विमुक्त, वंचित घटकातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या कामास माझ्याकडून शुभेच्छा. तसेच पुढील काळात लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपण पोलिस स्टेशनमध्ये कधीही येऊन सहकार्य करावे व सोबत राहून समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी शुभेच्छा दिल्या व वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या कार्यालयात बोलावून सत्कार केला त्याबद्दल आभार मानले.
यावेळी पोलीस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे, परदेशी मेजर, संतोष पिंपळे, विजय कुलकर्णी, मिरा तंटक, रूक्साना पठाण, बाबुराव फुलमाळी, जयश्री हातळगे, प्रशांत चव्हाण, हर्षद पवार, सोहेल बागवान, आदी कार्यकर्ते व महिला,मुले कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here