समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

0
162

जामखेड न्युज——

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

 

 

बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.(Latest Marathi News)अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे या ठिकाणचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला.

बस पलटी झाल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर टायरही फुटल्याचंही प्रवाश्यांनी सांगितलं. त्यानंतर डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट झाला. अपघात झाल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील आल्या. परंतु आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती बचवलेल्या प्रवाश्यांनी दिली आहे.(Latest Marathi News)अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला. यात चार मुलांचाही समावेश आहे.

 

काचा फोडून काही प्रवासी बाहेर :-विदर्भ ट्रॅव्हल्स पलटी होऊन अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले होते. चार ते पाच प्रवाशासह ट्रॅव्हल चालक व वाहक सुखरुप बचावले आहे.मृतकामध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश :-विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here