गीते बाबा संस्थानच्या किचन शेडसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वतीने मोठी मदत

0
169

जामखेड न्युज——

गीते बाबा संस्थानच्या किचन शेडसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वतीने मोठी मदत

श्री संत गीते बाबा संस्थांनच्या किचन शेडसाठी निलेश भाऊ गायवळ यांनी 12 ब्रास 80 बॉक्स फर्शीची केली मदत..

याबाबत माहिती अशी की, श्री संत गीते बाबा मंदिराचे काम लोकवर्गणीच्या माध्यमातून पूर्णत्वास चालले आहे. या ठिकाणी भावी भक्तांसाठी किचन शेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे, परंतु फर्शीचे काम अपूर्ण होते,येथील भक्तजन मा.सरपंच संजय गोपाळघरे, बाळासाहेब गीते यांनी उद्योजक मा. निलेश भाऊ गायवळ यांच्याकडे किचन शेडच्या फर्शी बसविण्याची मागणी केली होती, सामाजिक व धार्मिक कामात सतत मदतीत अग्रेसर असणारे निलेश भाऊंनी 2 बाय 4 ची 12 ब्रास 80 बॉक्स 70 हजार रुपये किमतीची मॅट व ग्लॉसी फर्शी तात्काळ गीते बाबा संस्थान कडे पाठवून दिली.


त्यामुळे येथील किचन शेडच्या फर्शी बसविण्याचे कामास सुरुवात झाली आहे, तसेच श्री संत गीते बाबा मंदिराच्या इतर कोणत्याही कामात पुढील काळात मदत लागली तर मी पुन्हा देईल असे निलेश भाऊ गायवळ यांनी सांगितले आहे.
खर्ड्या सारख्या ऐतिहासिक गावात श्री संत गिते बाबांचे मंदिर अल्पावधीतच नावारूपास आले आहे, येथील भाविक भक्तांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून भव्य मंदिर उभारले असून मंदिराच्या शिखराचे कामही पूर्ण झाले आहे, या ठिकाणी दर्शनासाठी खर्डा परिसरा सहित जामखेड, भूम, परंडा, करमाळा,बीड,अहमदनगर, व उस्मानाबाद जिल्ह्यातून दर्शनासाठी भाविकांचा ओढ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

पुढील काळात आमदार रोहित पवार यांनी श्री संत गीते बाबा मंदिरासाठी मंजूर केलेला शासकीय निधी लवकरच संस्थांच्या नावे वर्ग झाल्यानंतर येथील मंदिर परिसराच्या कामास खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. तोपर्यंत संत गीते बाबांचे भक्तजन हे भावीक भक्तांकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून मंदिर परिसराचे काम करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here