जामखेड न्युज——
बिंडावस्ती शिऊर येथील भाविकांचा गहिनीनाथ गडावरून परतताना अपघातात मृत्यू
तालुक्यातील शिऊर येथील बिंडावस्ती वरील काकासाहेब फाळके या भाविकांचा गहिनीनाथ गडावरून दर्शन घेऊन परत येत असताना नगर जामखेड रस्त्यावर आष्टा फाटा व पोखरी च्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडाजळ झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. यामुळे शिऊर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काकासाहेब फाळके बिंडावस्ती( शिऊर)येथील रहिवासी असून श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड चिंचोली येथे आषाढी एकादशीचे दर्शन घेवून सासरवाडी पांढरीतून जामखेडच्या दिशेने येत असतांना पोखरीच्या पुढे मोठया वडाजवळ अपघात झाला.अपघात इतका भयंकर होता की डोक्याच्या जागेवरच चिंधड्या झालेल्या होत्या. जागीच ठार झाले.
काकासाहेबांना दोन मुली काजल व अर्चना एक मुलगा प्रेमराज व पत्नी असा परिवार होता. काजल दहावीला, अर्चना आठवी तर प्रेमराज सातवीत शिकत आहे.कारखाना ऊस तोड मजूर म्हणून काम करणारे काकासाहेब हेच त्यांचा आधार होते. आधारच हरपला आहे. फार मोठे संकट या परिवारावर आले आहे.