जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना महामारीने दुसर्या टप्प्यात खुपच उग्र स्वरूप धारण केले आहे. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वैद्यकीय क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला आहे. यामुळे बेड मिळत नाही. आॅक्सिजन नाही, इंजेक्शन नाहीत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात अकरा दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आपला व आपल्या प्रियजनांचा जीव वाचवण्यासाठी कडकडीत बंद पाळावा असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी व्हिडिओद्वारे केले आहे.
माझं जामखेड माझी जबाबदारी अंतर्गत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यात म्हटले आहे की, शासनाने लाॅकडाउन केले आहे. पण काही बाबतीत शिथिलता दिलेली आहे याचा गैरफायदा अनेक लोक घेतात विनाकारण फिरतात सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत यामुळे कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन, व्यापारी, व्यावसायिक, सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन दिनांक १० मे ते २० मे पर्यंत अकरा दिवस कडकडीत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या कर्फ्यू मध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला जीव आहे. जीव वाचवण्यासाठी कडकडीत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जनतेला केले आहे.
