जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दिवसेंदिवस दिवस जामखेड शहराची कोरोना बाधितांची परीस्थिती बिकट होत आसताना आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यानसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १० ते २० मे पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला.
या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सभापती सुर्यकांत नाना मोरे, सावळेश्वर ग्रृपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश (दादा) आजबे, शिवसेना तालुकाउपप्रमुख संजय (काका) काशीद, व्यापारी सुरेश भोसले, सह अनेक व्यापारी उपस्थित होते.
जामखेड शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, जामखेडकरांकडुन प्रशासनाच्या सौजन्याचादेखील गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. त्यामुळे जामखेड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यू लावण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांचा बाहेरगावाहून माल घेऊन येणाऱ्या मालवाहतूक करणार्या मोठ्या वाहनांना माल खाली करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. तसेच उद्या शनिवार व रविवारी असे दि ८ ते ९ तारखेला दोन दिवस सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून पुढील १० ते २० मे पर्यंत अत्यावश्यक सेवा दिवसभर व दुध विक्री सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे.

गेल्यावर्षी शहरात कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र यावर्षी परिस्थिती भयानक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांना स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. दहा दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळून जनता कर्फ्यूत सहभागी व्हावे असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी जनतेला केला आहे.