जामखेड न्युज——
तरूणांना अभिमान वाटेल असे काम करणार- आमदार सत्यजित तांबे
राज्यातील तरूणांना अभिमान वाटेल असे काम करणार आहे. सध्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघाचा दौरा सुरू आहे. मतदारसंघात पाच जिल्हे, ५४ तालुके, पाच हजार गावे आहेत. खुप मोठा मतदारसंघ आहे तरी वर्षभरात सर्व दौरा करणार आहे. मतदारांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे याचबरोबर पगार खाते कोणत्या बँकेत ठेवायचे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. असे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा आज जामखेड येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी आले असता ल. ना. होशिंग विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, काँग्रेसचे अध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रदेश युवा सरचिटणीस राहुल उगले, सनराइज एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. संजय भोरे, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रशांत गायकवाड, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एल.डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सहसचिव पप्पू सय्यद, धनराज पवार माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड, सचिव रमेश बोलभट, विशाल डुचे, अमोल गिरमे, मयुर भोसले, विकास पवार, बी. ए. पारखे, मुख्याध्यापक साळवे डी. एन., तांबे सर, बडे सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची बांधणी डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे यामुळे माझा विजय सोपा झाला. मतदारांना अभिमान वाटेल असे काम करून दाखविणार, आपला देशच पुरोगामी आहे. यामुळे प्रगत आहे. आपण जातपात मानत नाहीत. आपल्या समाजसुधारकांनी आपला पुरोगामीचा पाया भक्कम केला. सर्वाना बरोबर घेऊन आपण चालतोय. काम करताना पक्ष कधीच पाहिला नाही. टीडीएफ ची खुप मदत झाली असेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.
सुट्टी व लग्नतिथी मोठी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे याबद्दल उपस्थितांचे विशेष आभार मानले.

यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे म्हणाले की,
डॉ. सुधीर तांबे यांच्या पेक्षा कामाचा आवाका आमदार सत्यजित तांबे यांचा जास्त आहे. जामखेड तालुका नेहमीच आपल्या बरोबर आहे.असेही सांगितले. तरुणांचे आयडाँल म्हणून आमदार सत्यजित तांबे यांच्या कडे पाहिले जाते.

कार्यक्रमाचे आभार प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मानले.










