कृतज्ञ आमदार सत्यजीत तांबे मतदारांच्या भेटीला..! विविध ठिकाणी गाठीभेटी घेत मानले मतदारांचे आभार आमदारकीला शंभर दिवस पुर्ण होण्याआधीच ऐंशी टक्के मतदार आभार दौरा पुर्ण

0
163

जामखेड न्युज——

कृतज्ञ आमदार सत्यजीत तांबे मतदारांच्या भेटीला..!

विविध ठिकाणी गाठीभेटी घेत मानले मतदारांचे आभार

आमदारकीला शंभर दिवस पुर्ण होण्याआधीच ऐंशी टक्के मतदार आभार दौरा पुर्ण

आमदारकिची शपथ घेऊन आणखी शंभर दिवस पुर्ण झाले नाहीत तरच आमदार सत्यजित तांबे यांनी जवळपास ऐंशी टक्के मतदारसंघाचा दौरा पुर्ण केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून बहुमतांनी निवडून आल्यानंतर आपल्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरु केलेला झंझावाती आभार दौरा सुरूच आहे. याच आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी अहमदनगरच्या टाकळी काझी, चिंचोडी व जामखेड विभागातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट दिली.

आमदार सत्यजीत तांबे आपल्या आभार दौऱ्यादरम्यान निवडणुकीच्या काळात पाठींबा देऊन खंबीरपणे साथ देणाऱ्या विविध शिक्षक संघटना, पदवीधर संघटना व डॉक्टर असोसिएशन्सच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. यांमध्ये नगर जिल्ह्यातील विविध संघटनांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. असे असताना, तांबे यांनी जामखेडच्या ल.ना. होशिंग विद्यालय येथे TDF संघटना, डॉक्टर संघटनांसह सर्व मतदार आणि कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अहमदनगरच्या टाकळी काझी येथील श्री बन्सीभाऊ म्हस्के आणि जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आमदार सत्यजीत तांबे यांनी भेट दिली. यावेळी, तेथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न त्यांच्यापुढे मांडल्या असून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तांबे यांनी सांगितले आहे.
जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित धोरण, कर्मचारी पगार कर्मचाऱ्यांच्या मनानुसार हव्या त्या बँकेत ठेवणे याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.


वडील डॉ. सुधीर तांबे यांची संपूर्ण मतदारसंघावर असलेली मजबूत पकड व सर्व मतदारांशी असलेले राजकारणापलीकडील कौटुंबिक नाते यामुळेच मतदारांनी आपल्यावर इतक्या मोठ्या संख्येने विश्वास दाखवला असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. ०५ जिल्हे ५४ तालुके व ४००० पेक्षा जास्त गावे अशी व्याप्ती असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील १३ तालुक्यांना भेट देणे अजूनही बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ सुरु असून मतदारसंघातील शाळा व महाविद्यालये सुरु झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी भेट देण्याचा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तांबे प्रयत्न करणार आहेत.

————————–
चौकट

ग्रामपंचायतींना दिली भेट!

आमदार सत्यजीत तांबे यांनी नगरच्या चिंचोडी पाटील व मिरजगांव ग्रामपंचायतींना सदिच्छा भेट दिली व गावांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार व मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळस, उपसरपंच आबासाहेब पाटील यांसह इतर सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here