महावितरणच्या बत्ती गुल मुळे, जामखेडमध्ये सलग बारा तास वीज दाखवा आणि बक्षीस मिळवा जामखेड येथील महावितरण कंपनीचा अजब कारभार!!

0
115

जामखेड न्युज——

महावितरणच्या बत्ती गुल मुळे,

जामखेडमध्ये सलग बारा तास वीज दाखवा आणि बक्षीस मिळवा

जामखेड येथील महावितरण कंपनीचा अजब कारभार!!

जामखेड शहरात सतत बत्ती गुल होत असल्याने नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात सतत लाईट गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या अजब कारभाराबद्दल सोशल मीडियावर बारा तास सतत लाईट दाखवा व बक्षीस मिळवा अशी पोस्ट सध्या जोरात व्हायरल होत आहे.


जामखेड शहरात सतत लाईट बंद असल्याने व्यापारी वर्गाला महावितरण कंपनीचा सतत त्रास सहन करावा लागत आहे. छोटे मोठे व्यापारी दिवसभर लाईट बंद असल्याने दुकानातील माल खराब होत आहे. तसेच महावितरण कंपनीस फोन केल्यास फोन देखील उचलण्यास कर्मचारी हजर नसतो. कदाचित जर फोन उचला असला तरी कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करीत आसतात.

जामखेड येथील तपनेश्वर भाग, पोलिस स्टेशन, मार्केट यार्ड, शिवाजीनगर, संताजीनगर
येथील डिपीचा सतत फेज जात असल्याने व कमी जास्त व्होल्टेज असल्याने घरातील फॅन, टि. व्ही., फ्रिज खराब होतअसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अधिकारी यांना देखील फोन केला असता ते देखील उडवा उडवीचे उत्तरे देत असतात. अधिकारी चा महावितरण कर्मचाऱ्यांनवर वचक राहत नसल्याचे दिसून येत असल्याने यांचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

जर लाईट बील भरून सुध्दा नागरिकांना न्याय मिळत नसेल तर नागरिकांनी जायचे कोण कडे ?
अशी चर्चा व्यापारी वर्गातुन होत असल्याने अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देवून जामखेड येथील लाईट चे अडचण दूर करावी अशी अपेक्षा नागरिकांन कडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here