जामखेड न्युज——
जामखेड बाजार समितीसाठी विक्रमी मतदान 98.48%
निकाल आजच
जामखेड बाजार समिती निवडणुक आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. चार वाजता मतदान संपले बाजार समिती साठी विक्रमी मतदान झाले आहे. तब्बल 98.48% मतदान झाले आहे आजच साडेपाच वाजता आदित्य मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुलाल कोणाचा हे काही तासातच समजेल.
जामखेड तालुक्यातील चार मतदान केंद्रावर किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले.
सोसायटी मतदारसंघात एकुण ६२७ पैकी ६२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
ग्रामपंचायत मतदारसंघात एकुण ५०९ मतदारांपैकी ५०२ मतदारांनी हक्क बजावला
तर व्यापारी मतदारसंघात एकुण ३३३ मतदारांपैकी
३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
तर हमाल मापाडी मतदारसंघात २४१ पैकी २४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
एकुण मतदान टक्केवारी 98.48% मतदान झाले आहे आजच साडेपाच वाजता आदित्य मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुलाल कोणाचा हे काही तासातच समजेल.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या घडामोडी घडत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे दोन आमदारांबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ या दोन युवा नेत्यांच्या भोवती फिरली होती. या दोघांनीही दोन्ही बाजूला दिलेल्या पाठिंब्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे. नेमका गुलाल कोणाचा हे पुढील दोन तासांतच कळेल.
मतदानासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलीसांनी चोख बंदोबस्त बजावला
जामखेड न्युज