Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या कोट्यवधी रुपयांच्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट इस्टीमेट नुसार काम नाही...

कोट्यवधी रुपयांच्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट इस्टीमेट नुसार काम नाही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

0
184

जामखेड न्युज——

कोट्यवधी रुपयांच्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट इस्टीमेट नुसार काम नाही

अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जामखेड शहरातून पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. सध्या पंचदेवालय ते विचंरणा नदीपर्यंत काम सुरू आहे. ठेकेदारांने सब ठेकेदार नेमलेला आहेत. सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. डांबरी रस्ता न खोदता त्यावरच मुरूम टाकलेला आहे. राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचे पुर्णतः दुर्लक्ष आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या रस्ता निकृष्ट होत असल्याने लवकरच रस्ता खराब होईल. कोट्यवधी रुपये पाण्यात जातील.

संबंधित ठेकेदारांने सब ठेकेदार नेमलेला आहे.
या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असलेला रस्ता नियोजनाचा अभाव अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे निकृष्ट प्रतीचा होत आहे. डांबरीवरच मुरूम टाकलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या इस्टीमेट नुसार काम होत नाही. संपूर्ण रस्ता खोदकाम करून मुरूम भरून दबाई करणे आवश्यक आहे पण तसे न करता काही ठिकाणी डांबरी रस्त्यावरच मुरूम टाकला जात आहे. यामुळे निश्चितच रस्त्याचे आयुष्य कमी होणार आहे.

रस्ता सुरू झाल्यावर गोरगरीब लोकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतले मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तसेच आहेत काढून घेतलेल्या अनेक लोकांनी परत गाडे लावण्यास सुरूवात केली आहे. यातच हे प्रकरण कोर्टात गेले आहे. सहा आठवड्यात संयुक्त मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रस्त्यावर अस्ताव्यस्त मुरूम टाकला जात आहे नीट दबाई केली जात नाही. तसेच पाणीही मारले जात नाही यामुळे धुळीचे लोट ची लोट उठत आहेत.
धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनाही याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे. तसेच काही ठिकाणी मातीमिस्त्रीत मुरूम तर काही ठिकाणी दगडगोटे असलेला मुरूम टाकलेला आहे यामुळे अनेक गाड्या घसरून अपघात होतात तसेच धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू असून अत्यल्प प्रमाणात मारलेले पाणी लगेच सुकून जाते लगेच धुराचे लोट ची लोट उडत आहेत.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे वाहनांमुळे धुळीचे लोट उठत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीक या धुळीने त्रस्त झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!