जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मदतीला दुसरे प्राध्यापक राष्ट्रवादीत कान भरणाऱ्यांना किंमत यामुळे घेतला निर्णय

0
214

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मदतीला दुसरे प्राध्यापक

राष्ट्रवादीत कान भरणाऱ्यांना किंमत यामुळे घेतला निर्णय

 

जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यानिमित्ताने दोन्ही आमदारांनी बाजार समिती साठी कंबर कसली आहे. यातच प्रा. सचिन गायवळ काय निर्णय घेणार, राळेभात बंधू कोणाबरोबर युती करणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते यातच प्रा. सचिन गायवळ यांनी आपल्या आपल्या समर्थकांचा मेळावा घेत आमदार प्रा राम शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती अशी की जामखेड बाजार समितीची निवडणूक ही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे, कट शहाच्या राजकारणात शेवटच्या क्षणी कोण कोणाबरोबर जाणार हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांनी सोनेगाव येथील फार्म हाऊसवर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, सर्व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून यावेळी बोलताना प्रा. सचिन गायवळ म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिक पणे केले आहे पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी अनेक ग्रामपंचायती व सेवा सोसायटी ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणाऱ्यांपेक्षा कान भरणाऱ्या लोकांना किंमत दिली जात असल्याची खंत व्यक्त केली.

कालपर्यंत आम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत होतो परंतु कोणीही याची दखल घेतली नाही त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, याबाबत वेळ पडली तर मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईल परंतु माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही तसेच या बाजार समितीच्या निवडणुकीत तन-मन-धनाने प्रचार करून गुलाल अंगावर घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे प्राध्यापक सचिन सर गायवळ यांनी जाहीर केली यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडात केला.

अतिशय शेवटच्या क्षणी घाईघाईत बोलावलं या बैठकीला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here