जामखेड न्युज——
नागेश विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक संतोष ससाणे यांना एक लाखाची फेलोशिप
वोडाफोन इंडिया फेलोशिप अवॉर्ड 2021 – 22 नागेश विद्यालयाचे संतोष ससाणे यांना जाहीर
रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालय जामखेडचे गुरुकुल प्रमुख तज्ञ गणित मार्गदर्शक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप अवॉर्ड 2021 – 22 जाहीर झाला आहे. एक लाखाची फेलोशिप मिळाली आहे.
यावर्षी एकून 110 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला. यामध्ये रयत शिक्षण संस्थेतून हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दहा शिक्षकांमध्ये श्री ससाणे एस आर यांचा समावेश आहे या पुरस्कारा अंतर्गत त्यांना रुपये एक लाख फेलोशिप मिळाली आहे.
विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के उपप्राचार्य तांबे पी ए ,पर्यवेक्षक, कोकाटे व्ही. के, सोमीनाथ गर्जे, अशोक सांगळे संतोष पवार, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित दादा पवार, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, शिवाजीराव तापकीर, काकासाहेब वाळूजकर स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी ,विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, यांनी अभिनंदन केले.
संतोष ससाणे सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, विकास समिती, पालक शिक्षक संघ, सर्व समित्या व सर्व रयत सेवक शिक्षक बंधू व भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.