जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात १६१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साधनांचा वाटप होणार
जामखेड तालुक्यातील अरणगांव, पिंपरखेड, जामखेड मध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा तसेच विविध विकास कामाचा शुभारंभ दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न होणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019च्या निवडणुकीत घरोघर पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा शब्द दिला होता याचीच वचनपूर्ती करण्यासाठी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील अरणगाव, पिंपरखेड हे दोन गावे तसेच जामखेड शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
अरणगाव जलजीवन मिशन योजना 2 कोटी 66 लाख रुपये , पिंपरखेड जलजीवन मिशन योजना 1कोटी 26 लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग 548 डी जामखेड ते सौताडा रस्ता 157 कोटी 62 लाख रुपये तसेच जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साधनांचा वाटप राज लॉन्स येथे करण्यात येणार आहे.
या शुभारंभ समारंभास ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी केले आहे.